Share Now
Read Time:54 Second
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : पाव (ब्रेड) उत्पादन कारखाने हे जीवनावश्यक बाबीमध्ये येत असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक बाबीतून वगळण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक २३ एप्रिल २०२० च्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पाव (ब्रेड) उत्पादन कारखान्यांना प्रतिबंधीत आदेशातून वगळण्यात येत आहेत.
Share Now