Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील डॉ. सलीम चमन शेख आणि तनवीर बागवान मित्र मंडळ यांच्याकडून तीनशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मिरजेचे डीवायएसपी संदीप सिंह गिल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, एपीआय इंद्रजित वर्धन, नगरसेवक अखतर नायकवडी, नगरसेवक मेनुद्दीन बागवान, जमिल बागवान, राष्ट्रवादीच्या महिला मिरज शहर अध्यक्ष वंदना चंदनशिवे, आजम काझी, मुन्ना चमनशेख, डॉ.इम्रान जमादार, इलियास माणिकभाई, जुबेर नरवाडे, यासीन मनेर, असिफ गोलनंदाज यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
मिरज शहर आणि ग्रामीण भागातील तीनशे लोकांची यादी तयार केली, असून गरजू लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन हे जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले जात आहे.
Share Now