Share Now
Read Time:1 Minute, 11 Second
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात काही दुकाने/आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी याबाबत “राज्य सरकारने अधिसूचना काढल्याशिवाय कोणीही अशा प्रकारच्या आस्थापना / दुकाने सुरू करू नयेत”. असे निर्देशित केले आहे .
जोपर्यंत राज्य सरकार अशा प्रकारची अधिसुचना काढत नाही तोपर्यंत संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील, याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घेऊन लाॅकडाऊनला सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Share Now