Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू असताना या आपत्तीला देखील संधी मानून मा.आयुक्तसो कोल्हापूर यांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मान्सून पूर्व कामांची लगबग चालू आहे. प्रथमत: संपूर्ण शहरात औषध फवारणी, धूर फवारणी इत्यादी माध्यमातून शहर निर्जंतुकीकरण करण्याचे काम मोठ्या प्रामाणात सुरु आहे.
या काळातच कोल्हापूर शहरातील प्रमुख भाजीपाला मंडई मधील व्यवसाय बंद करून त्यांची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हबकच्या माध्यमातून या मोठ्या मंडईंची स्वच्छता करणे ही गरज आहे, कारण इतर वेळी पहाटे ५ पासून रात्री १० पर्यंत सर्वसामान्य लोकांचा व भाजीपाला विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. परंतु या लॉकडाऊनच्या काळात आपल्यासारख्या स्वच्छता दूताने मनावर घेतल्यास, या भाजीपाला मंडईची चांगल्या पद्धतीने स्वच्छता करता येईल. मंडई अंतर्गत असणाऱ्या सांडपाण्याच्या गटर्स, ड्रेनेज लाईन चांगल्या पद्धतीने साफ करता येतील. या निवेदनाद्वारे मा.आयुक्तसो यांच्याकडे मागणी करण्यात आली कि, आपण आपल्या अधिकाऱ्यां सोबत या भाजीपाला मंडईची प्रत्यक्ष पाहणी करावी जेणेकरून यामध्ये असणाऱ्या अनेक त्रुटी आपल्या निदर्शनास येतील.
असे निवेदन भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने मा.जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, गटनेते अजित ठाणेकर, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, नगरसेवक भाग्यश्री शेटके, विजयसिंह खाडे पाटील, आशिष ढवळे, उमा इंगळे, सविता भालकर, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, मनीषा कुंभार, गीता गुरव, किरण नकाते यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तसो यांना ईमेल द्वारे दिले.