खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा,

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 13 Second

 Media control news network 

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्‍वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला.

यानिमित्ताने  कोल्हापुरातील हायलँड क्लब येथे शाही स्वागत समारंभ पार पडला. अत्यंत दिमाखदार अशा या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला-क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावून, वधुवरांना शुभाशिर्वाद दिले. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, नामदार चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख, लक्ष्मणराव ढोबळे, खासदार सुजय विखे-पाटील, धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, हेमंत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह मोहिते- पाटील, प्रसाद लाड, धैर्यशिल मोहिते-पाटील, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, उद्योगपती संजय घोडावत, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, कुलगुरू डी.टी. शिर्के, काडसिध्देश्‍वर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, स्वरूप महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक, पृथ्वीराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रमुख मान्यवरांचा विशेष स्वागतपर सत्कार करून, महाडिक परिवारातील सदस्यांनी उपस्थित पाहुण्यांचे आदरातिथ्य केले. अत्यंत शाही आणि दिमाखदार अशा या सोहळ्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हयासह संपूर्ण राज्यातून आणि देशातून विशेष मान्यवर आवर्जुन उपस्थित राहिले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *