एस.टी.सरकार गँग जिल्ह्यातून हद्दपार….

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 40 Second

जावेद देवडी/कोल्हापूर: इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा मध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या “एस.टी. सरकार गँगला जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणा-या गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत.

त्यानुसार इचलकरंजी शहरातील एसटी सरकार गँगचा प्रमुख संजय शंकरराव तेलनाडे तसेच त्याचे सहकारी अरविंद सुकुमार राकेश सुरेश कुंभार, दिपक सतिश कोरे इमरान दस्तगीर कलावंत, आरिफ दस्तगीर कलावंत, अभिजीत सुभाष जामदार या सर्वांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी दिनांक ०७/०६/२०२४ रोजी “एस.टी. सरकार गँग” या टोळीच्या प्रमुखासह त्याच्या 7 सहकाऱ्यांना कोल्हापूर जिल्हातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यांनी पुढील कारवाई केली.

हद्दपार कारवाई केलेल्या गँग मधील कोणताही आरोपी कोल्हापूर शहरात दिसुन आला तर जवळच्या पोलीस ठाण्यास संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *