प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या…..

वसई : वसईत प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर तरुणाकडून तरुणीवर हल्ला केला जात असताना कुणीही पुढे गेलं नाही. तरुणाच्या हातात लोखंडी पाना होता. त्याने तरुणीच्या डोक्यात वार केले. घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या तरुणीशी तो बोलत होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने लोखंडी पाना तिच्या डोक्यात मारला. या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसई पूर्व चिंचपाडा परिसरात रोहित यादव नावाच्या तरुणाने आरती यादव हिची हत्या केली. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी रस्त्याने जात असताना मागून येत तरुणाने तिच्या डोक्यात वार केले. यानंतर खाली पडलेल्या तरुणीच्या डोक्यावर जोरजोरात वार केले. तरुणाला काहींनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. तोपर्यंत ती गतप्राण झाली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *