वैद्यकिय तपासणीसाठी महानगरपालिकेस आठ डॉक्टर्स उपलब्ध करुन देणार : रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन

 कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांच्या वतीने  महानगरपालिकेस मोबाईल व्हॅनमध्ये वैद्यकिय तपासणीसाठी आठ एम.बी.एस.डॉक्टर्स उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आज महानगरपालिकेमार्फत देण्यात आली. 

कोरोना विषाणू कोवीड -१९ चा पादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील झोपडपट्टयांमध्ये प्रतिबंधात्मक उपयायोजना करणेसाठी सर्व झोपडपट्टीमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोबाईल व्हॅनमधून वैद्यकिय सेवा दिली जात आहे.ही सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आठ वैद्यकिय टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. या टीम सोबत एम.बी.बी.एस आठ डॉक्टर्स व मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ता रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन उपलब्ध करुन देणार आहेत.

Advertisements

याबाबत आज निवडणूक कार्यालय येथे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे संग्राम पाटील, मिलिंद आष्टेकर, अनिकेत आष्टेकर, डॉ.प्रकाश संघवी, डॉ.विलास नायका व आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांच्या समन्वयाने झोपडपट्टीमध्ये वैद्यकिय उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

झोपडपट्टीमधील नागरीकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तसेच राजेंद्रनगर येथे स्थानिक नगरसेविका सौ.रुपाराणी निकम, महापालिका व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांच्यावतीने फिव्हर क्लिनीक सुरु करण्याचे ठरले आहे. तसेच आयसोलेशन हॉस्पीटल व सावित्रीबाई फुले हॉस्पीटल याठिकाणी मेडिकल साहित्य उपलब्ध करुन देत असलेचे रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या संग्राम पाटील यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *