कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार, बेघर व अपंग व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा पुरविण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.
या आवाहनास प्रतिसाद देऊन विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे, उद्योजक यांच्याकडून अन्नधान्य, साहित्य स्वरुपात मदत महानगरपालिकेकडे प्राप्त झालेली आहे. महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या मदतीच्या आवाहनास शहरातील संस्था व नागरिकांनी आजही प्रतिसाद दिला. आज कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनकडून १५०० मास्क व ५० किलो चटणी, १४०० किलो तांदूळ असे अन्नधान्याचे किट्स आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचेकडे दिले आहेत.
तसेच आज परराज्यातील विस्थापित कामगार, बेघर कुटुंब, दिव्यांग व्यक्ती व रेशकार्ड नसलेले कुटुंब यांचेसाठी महापालिकेच्यावतीने 58 किट्सचे वाटप करण्यात आले. आज विभागीय कार्यालय क्रं.१ गांधी मैदान अंतर्गत संभाजीनगर, जवाहरनगर, सानेगुरुजी वसाहत, नाथागोळे तालीम असे सुमारे १४ कुटुंबांना अन्नधान्याचे किट्स उपशहर अभिंयता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुनिल भाईक, अनिरुध्द कोरडे यांनी वाटप केले.
तसेच आज विभागीय कार्यालय क्रं.३ अंतर्गत जवाहरनगर, सुभाषनगर, शाहूपूरी, प्रतिभानगर, राजारामपूरी, बागलचौक, राजारामपूरी, राजेंद्रनगर असे सुमारे ३२ कुटुंबांना अन्नधान्याचे किट्स उपशहर रचनाकार एन.एस.भोसले, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, निश्चल कांबळे यांनी वाटप केले.