व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी साधला संवाद

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : माजी केंद्रीय मंत्री तसेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय प्रवक्ते मा.शहानवाज हुसैन , केंद्रातील ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद अन्सारी ,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.हाजी एजाजभाई देशमुख,राज्य हज कमिटी अध्यक्ष मा.हाजी जमालभाई सिद्दीकी यांनी covid १९ कोरोना महामारी संदर्भात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक घेतली. तसेच जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केल्या.            कोल्हापूर मधून शाहरुख गडवाले भाजपा अ. यु. मो प्रमुख कोल्हापूर यांनी संवाद साधला. तसेच करत असलेल्या कार्याची प्रशंसा मा. शहानवाज हुसैन, मा. अब्दुल रशीद अन्सारी,मा.एजाज देशमुख यांनी केली. रमजान महिन्याच्या शुभेच्छाही दिल्या. शहारुख गडवाले यांनी आज रमजानच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या व घरातच राहूनच “सण साजरा करूया कोरोना विषाणूच्या पादुर्भावातून आपल्या देशाला मुक्त करूया”, असा कोल्हापूर शहरवासीयांना संदेश दिला.
मा. शहानवाज हुसैनजी यांनी हिंदीत संवाद साधला.  ते म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा पदाधिकारी बन्धु, बहनो से आज व्हीडीयो से संवाद किया.  सभी को पवित्र रमज़ान की ढेरों शुभकामनाएँ दी! सभी का बहुत आभारी हूँ ,सब्र में बहुत बड़ी ताक़त होती है और इसी के साथ हम कोरोना को मात देंगे. हमें संकल्प करना है इस पाक महीने में कोई जरूरतमंद भूखा ना रहे।
मा. नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. असे शहानवाज हुसैन यांनी सांगितले.
शाहनवाज हुसैन साहेबांनी सिनेअभिनेता इरफान खान यांच्या झालेल्या दुःखद निधनामुळे भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *