पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानंतर बफर झोनमधील बांधकाम काढून घेण्याच्या नोटीसांना तूर्तास स्थगिती

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 31 Second

सांगली प्रतिनिधी शरद गाडे  : सां. मि. कु. महानगरपालिका क्षेत्रांतील बफर झोनमधील अनधिकृत व नियमबाह्य बांधकामे काढून घेण्यासंदर्भात महानगरपालिका नगररचना विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ४१(२) अन्वये नोटीस देण्याचे कामं लाॅकडाऊनचा काळ चालू असताना सुरू आहे.
लाॅकडाऊनकाळांत नोटीस आल्याने शहरातील बफर झोनबाधीत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणांत भितीचे वातावरण निर्माण झालेले असून लाॅकडाऊनमुळे गेली दिडमहिन्यांपासून हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचे खाण्यांपिण्याचे आतोनांत हाल होत आहेत, अशामध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून ३० दिवसांत घरे काढून बफर झोन परिसर खुला करण्याचे कडक निर्देश नोटीसीद्वारे देण्यांत आले आहेत.
आज शहरांतील बाधित नागरिकांचे प्रश्न घेऊन प्रमुख नागरिकांचे शिष्टमंडळ घेऊन स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेशअध्यक्ष उत्तमराव (आबा) कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांची भेट घेतली व सर्व अडी-अडचणीं समजावून सांगितल्या. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची नागरिकांचे शिष्टमंडळासहित भेट घेऊन बफर झोनमधील बांधकामे काढून घेण्याच्या नोटीसींमुळे भयभीत झालेल्यां नागरिकांचे प्रश्न ऐकून सदर बांधकाम काढून घेण्याच्या नोटीस प्रकरणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ स्थगिती देण्याचे आदेश दूरध्वनीवरुन दिले.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सदर प्रकरणी बफर झोनमधील बांधीत नागरिकांचे नोटीसांची कारवाई थांबविण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे लाॅकडाऊन काळात अशा निर्णयाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार, नगरसेवक आयुब बारगिर, स्वाभिमानी गंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेशअध्यक्ष उत्तमराव(आबा) कांबळे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल हिप्परकर, युसूफ जमादार मुख्य सचिव मनोज भिसे, अलका ठोंबरे, आरती बामणे, सुशांत शिंदे ,लक्षमन ऐवळे संतोष कांबळे, अमर पवार , अर्जुन मजले, दिलावर पट्टेवाले तसेच भागांतील प्रमुख नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *