कॅप्टनसी टास्कदरम्यान निक्की अन् आर्या भिडल्या

Bigg Boss Marathi New Season Day 10 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान बॉलिवूड गाजवणारी निक्की तांबोळी आणि रॅपर आर्या जाधवमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. एकमेकींसोबत भिडतानाचा त्यांचा प्रोमो समोर आला आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ या टास्कमध्ये कोण विजयी होणार आणि कोणाला पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. कॅप्टनला यंदा नक्की कोणते अधिकार मिळणार हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *