Share Now
Read Time:1 Minute, 14 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात गौतम बुध्दांच्या पुतळयास महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
तसेच परिवर्तन फोंडेशन व साळवी प्रतिष्ठान यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापूर शहर बुध्दवासियांनी लॉकडाऊन काळात कोरोना विषाणूची दक्षता घेत, सोशेल डिस्टेंसिंग पळत घरीच राहून बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी परिवर्तन फोंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुरणे, साळवी प्रतिष्ठान अध्यक्ष अक्षय साळवी , रविराज कोलटकर, मुबारक अत्तार, शिवाजी शिंगे, शरद माळी, दिनेश चोरगे हे उपस्थित होते.
Share Now