विना मास्क व हॅण्डग्लोज न घातलेल्या ८४ जणांकडून २०१०० चा दंड वसूल

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आणि त्यांच्या पथकाने शहरातील विना मास्क, विना हातमोजे, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे व सोशल डिस्टंन्स न पाळणे अशा ८४  भाजी, दुकानदार, मेडिकल विक्रेते व मास्क न घातलेले नागरीक यांच्याकडून महापालिकेने आज कारवाई करुन २०१००/- रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच पंचगंगा नदी घाट येथे नागरीक निर्माल्य नदीच्या पात्रात टाकत असलेचे दिसून आले. त्या नागरीकास नदी पात्रात टाकण्यात आलेले निर्माल्य काढण्यास भाग पाडले व प्रदूषण रोखण्याबात प्रबोधनही करण्यात येऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी माहिती शिक्षण संवाद अधिकारी निलेश पोतदार, आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, ऋषिकेश सरनाईक यांनी ही कारवाई केली.

Advertisements

त्याचप्रमाणे आज शहरातील विना मास्क, विना हातमोजे अशा ८४ नागरिक, धान्यविक्रेते, दुकानदार, भाजी विक्रेते, सार्वजिन ठिकाणी थूंकल्याबद्दल व सोशल डिस्टंन्स न पाळलेबद्दल यांच्यावर रक्कम रुपये २०१००/-दंड वसूल करण्यात आला. यामध्ये मुक्त सैनिक वसाहत, कावळा नाका, दुधाळी मैदान परिसर, कळंबा रिंगरोड, नविन वाशीनाका, लक्ष्मीपूरी धान्यओळ,  या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, निखील पाडळकर, आरोग्य निरिक्षक गीता लखन, शिवाजी शिंदे व कर्मचारी यांनी केली. तरी शहरातील भाजी, दुकानदार, मेडिकल विक्रेत्यांनी हॅण्डग्लोज व मास्क न घातलेस सदरची कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विक्रेतांना वारंवार मास्क व हॅन्डग्लोज वापरण्याबाबत आवाहन केले आहे. विक्रेत्यांना सामाजिक अंतर ठेवण्यास सांगीतले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यता प्रशासनास कडक कारवाई करावी लागेल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.    

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *