शिवाजी विद्यापीठात सुरू होणार्या् कोरोना रूग्णालयासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाडिक परिवाराच्यावतीने १०० बेडस् प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ५०० बेडची दोन कोरोना हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्यापैकी एक हॉस्पिटल शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात बनत आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, या नव्या कोरोना हॉस्पिटलसाठी, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि महाडिक परिवाराकडून आज १०० बेडस् प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी या मदतीचा स्विकार करत, महाडिक परिवाराच्या दातृत्वाची प्रशंसा केली.

महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, शासन स्तरावर विविध उपाय योजले जात आहेत. त्या तुलनेत कोल्हापुरात कोरोना व्हायरसला रोखण्यात चांगले यश आले आहे. त्यासाठी गेले दिड महिना जिल्हा प्रशासन अहोरात्र काम करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजी विद्यापीठ आणि संजय घोडावत युनिव्हर्सिटी अशा दोन ठिकाणी प्रत्येकी ५०० बेडची कोरोनाची अद्ययावत हॉस्पिटल उभी करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी समाजातील दातृत्वशिल व्यक्ती आणि संस्थांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले होते.

त्यांच्या या आवाहनाला भारतीय जनता पक्ष आणि महाडिक परिवाराने सर्वप्रथम प्रतिसाद दिला आणि या रूग्णालयासाठी १०० बेडस् देण्याची घोषणा केली. त्यानुसार आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांच्याकडे १०० बेडस् सुपुर्द केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. कोरोनाची लढाई लढण्यासाठी महाडिक परिवाराने जिल्हा प्रशासनाला दिलेला शब्द पुर्ण केला आहे. यापुढेही प्रशासनाला लागेल ती मदत करण्यासाठी भाजप आणि महाडिक परिवार आपल्या सोबत असेल, असे अभिवचन प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी प्रशासनाला दिले.

शिवाजी विद्यापीठात तयार होणार्‍या या हॉस्पिटलमध्ये सेमी अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन अशा सुविधा असणार आहेत. महाडिक परिवाराकडून मिळालेल्या १०० बेडमुळे हॉस्पिटल उभारणी अधिक वेगाने होणार असून, रूग्णांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे महाडिक कुटुंबियांकडून जिल्हा प्रशासनाला मिळालेली मदत लाख मोलाची आहे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी नमुद केले.

यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर, उपअभियंता प्रशांत कांबळे, मिलिंद किटवाडकर, भाग्यश्री परब, अनिकेत शिर्के, अनिल जाधव, प्रविण पारकर, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, विश्‍वराज महाडिक, समिर सेठ, इंद्रजित जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *