कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : धान्य वितरण करताना योग्य पद्धतीने करा, कोणीही शिधापत्रिकाधारक वंचित ठेवू नका , गरीब व गरजूला धान्य पोहचले आहे का , याची खात्री प्रशासनाने करावी , अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.
शहरातील शिधापत्रिका दुकानांना व्यवस्थित धान्य पुरवठा होतो की नाही, या यासंदर्भात आमदार जाधव यांनी शहर पुरवठा कार्यालयाला भेट देऊन धान्य वाटपाचा आढावा घेतला.
याबाबत श्री. जाधव यांनी प्रत्येक दुकानाबाहेर किती धान्य वाटप केले, किती धान्य शिल्लक आहे, यासंबंधीचा सर्वसमावेशक माहिती असणारा बोर्ड लावण्याची सूचना शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांना केली.
ज्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वाद तर होणार नाही. व प्रत्येक ग्राहकालाही माहिती मिळेल, अशा स्वरूपाच्या सूचना केल्या.
दरम्यान शिंदे यांनी सांगितले की, शहरात एकूण १६४ दुकाने असून धान्य वाटपात कोणतीही तक्रार नसून मोफत तांदळाचे ९७ टक्के वाटप झाले आहे, तर नियमित धान्याचे ९९ टक्के वाटप झाले आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना मे महिन्याचे धान्य वाटप सुरू असून ते ३० टक्के झाले आहे.
धान्य वितरणाबाबत तक्रारी येऊ देऊ नका, आमदार चंद्रकांत जाधव यांची सूचना

Read Time:1 Minute, 49 Second