कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कनानगरात ३० एप्रिल रोजी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने हा परिसर सर्व बाजूंनी महानगरपालिकेलने सील केलेला आहे. येथे कोणाला बाहेर व आत सोडले जात नाही यामुळे या प्रशासनाने किमान अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात अशी मागणी नागरीक करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी काल शुक्रवार ८ मे रोजी सायंकाळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी फिरती करुन पाहणी केली.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कनाननगर येथे युध्दपातळीवर सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाची माहिती घेतली. या ठिकाणच्या सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण झाले असून दैनंदिन औषध फवारणी केली जात आहे.
तसेच या ठिकाणी शौचालयांची स्वच्छता दैनंदिन होत का नाही याची पाहणी यावेळी आयुक्तांनी केली. या भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने सुरु राहतील आणि त्यांच्या कडून ताप, सर्दी, खोकला असलेले पेशंटची दैनदिन तपासणी करणेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
यावेळी आयुक्तांनी येथील नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिल्या. यावेळी सभागृहनेता दिलीप पोवार, बाळासाहेब होळकर समाजाचे उपस्थित होते.