अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनीच दुकाने सुरु ठेवावीत : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

     कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी ८ मे रोजी कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी फिरती केली. फिरती करताना आयुक्तांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम याठिकाणी सुरु असलेल्या दुकानदाराची भेट घेऊन कॉप्लेक्समधील अत्यावशक सुविधा देणा-यांना वगळून इतर कोणालाही परवानगी नसलेचे तेथील व्यावसायीकांना सांगीतले. शहरामध्ये असी ४५ कॉप्लेक्स असून त्याठिकाणी अत्यावश्यक सेवा व्यतिरीक्त कोणतीही दुकाने  सुरु करणेस महापालिकेच्याकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कॉप्लेक्स मधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही आपली दुकाने उघडू नयेत, अशी समज आयुक्तांनी व्यापाऱ्यांना दिली.  जर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कोणतीही दुकाने सुरु असल्याचे आढळल्यास , त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी केले.

तसेच महापालिकेच्यावतीने स्थापन करण्यात आलेले आलगीकरण कक्षामध्ये ४३३ नागरीकांना ठेवण्यात आले असून, यामध्ये शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील अलगीकरण कक्षामध्ये ६० , खाजगी ठिकाणी , आणि अंडी ऊबवणी केंद्र येथे ३५ , पंजाबराव देशमुख वस्तिगृह ६४ , गर्व्हमेंट पॉलिटेक़्नीक १८  व राजाराम कॉलेज ५१ , अल्पसंख्यांक मुलींचे वस्तीगृह ७३ , आयसोलेशन , कृषी विद्यापीठ वस्तीगृह ३७, शिवाजी विद्यापीठ ४९ , न्यू कॉलेज वस्तीगृह २९ नागरीकांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांना चौदा दिवस या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. होम कोरंटाईन म्हणून ५२६  नागरीकांना ठेवण्यात आले आहे.   आलगीकरण कक्षाकरीताही महापालिकेच्यावतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Advertisements

आलगीकरण कक्षाकरीताही महापालिकेच्यावतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *