कोल्हापूर प्रतिनिधी सतिश चव्हाण : वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या व्यवसायात आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देऊन त्याला गतवैभव मिळवून देऊया, असा आश्वासक पाठिंबा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी दिला.
कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, सांगली जिल्हा सराफ समिती, सिंधुदुर्ग जिल्हा सराफ संघ आणि ज्वेलर्स साथीच्या सहयोगाने उडान-२०२० या कार्यक्रमांतर्गत झूम ॲपच्या माध्यमातून सराफ व सुवर्णकारांसाठी वेबिनार चर्चासत्राचे आयोजन केले होते.
कोरोना व्हायरसमुळे जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीत होणारे बदल आणि ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये कशी असेल व्यापाराची स्थिती या दोन प्रमुख मुद्द्यांबरोबर उपस्थित होणाऱ्या शंका-कुशंकावर आधारित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिकांची उपस्थिती होती.
श्री. रांका म्हणाले, प्रत्येक जण चिंतेत आहे. अशावेळी संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा. आपला व्यवसाय वाढवावयाचा असेल तर ऑनलाईन व्यवसाय करा, आपल्या ग्राहकांशी व्हॉटस अपच्या माध्यमातून संपर्कात राहा. सेवेला महत्त्व द्या. आज जरी व्यवसाय नसला तरी पुढे श्रावण महिना, गणपती, नवरात्री, दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई येईल.
ते म्हणाले, प्रामुख्याने कोल्हापूर शहर दागिन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. अशावेळी एमएसएमईसारख्या योजनांच्या माध्यमातून कर्ज घ्या आणि व्यवसाय वाढवा. जेणेकरून स्थानिक पातळीवर सराफ व्यवसायाला पुन्हा गती येईल.
झूम ॲपच्या माध्यमातून सराफ व सुवर्णकारांसाठी वेबिनार चर्चासत्र

Read Time:2 Minute, 27 Second