स्वरा वेल्फेअर फौंडेशनने सुरू केले “सँक मार्ट ” नावाचे अँप

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार :  स्वरा वेलफेअर फौंडेशन ही संस्था पर्यावरण वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करते कोल्हापूर महानगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता अभियानात आवर्जून सहभाग नोंदवत असते त्यातच स्वरा वेल्फेअर फौंडेशन ने ऑनलाईन बाजार सँक मार्ट (Sank Mart ) नावाचे अँप सुरू केले आहे हे अँप्लिकेशन आपण सहज आणि एकदम साध्या पद्धतीने प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता
या अँप्लिकेशनद्वारे आपण घरी बसल्या सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या , फ़ळे ,सर्व किराणा,मसाले’तसेच बेकरी प्रॉडक्ट अगदी वाजवी दरात मागवू शकता आणि तुमचा बहुमोल वेळ वाचवू शकता.
या अँप्लिकेशनचे उदघाटन कोल्हापूर महानगर पालिका आयुक्त मा श्री मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते स्वरा वेल्फेअर फौंडेशन डायरेक्टर प्रमोद माजगावकर ,पन्हाळा तालुका अध्यक्ष नागेश कुंभार ,अमर कुंभार ,सुभाष कुंभार यांच्या उपस्थितीत झाले तरी हे अँप्लिकेशन डाउनलोड करून आपला बहुमोल वेळ वाचवावा असे आवाहन प्रमोद माजगावकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *