आरोग्य विभागाच्यावतीने दुस-या टप्यात ५११४ घरांचे व २७२११ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी  :  भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.    पहिल्या टप्यामध्ये १८ मार्च रोजी पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये १४४३१९ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ६२८५३२ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्यात ९ मे रोजी ५११४ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये २७२११ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
सदरचे सर्व्हेक्षण कदमवाडी, ताराबाई पार्क, रंकाळा टॉवर, मरगाई गल्ली, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, निकम गल्ली, रायगड कॉलनी, देवकर पानंद, सानेगुरुजी वसाहत, साळोखे नगर, आपटे नगर, नर्सिग कॉलनी, फुलेवाडी, नाना पाटील नगर, मोतीनगर, सदर बाजार, कावळा नाका, भोसले पार्क, कदमवाडी, विचारे माळ, राजरामपूरी, मातंग वसाहत, यादव नगर, दौलत नगर, शाहुपूरी, रमन मळा, सोमवार पेठ, शनिवार पेठ, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, रुक्मिणी नगर , टाकाळा, महाडीक माळ, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टॅन्ड, कनाननगर, ताराबाई पार्क, कसबा बावडा, मोरे माने नगर, रामानंद नगर, जरगनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्र नगर, ताराराणी कॉलनी, एस.एस.सी.बोर्ड परिसर या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले.
या दुस-या टप्यामध्ये आज अखेर ११७५१६ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ५२०००२ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *