स्थानिक कलाकार घेऊन चित्रीकरण पूर्ण करा : सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्ष वाईकर

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  कोल्हापूर मध्ये चित्रीकरणासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात यावे असे निवेदन सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना देण्यात आले.

कोरोना महामारी ने जगभर हाहाकार माजला आहे, यामुळे अर्थव्यवस्था खिळ -खिळी झाली आहे, तर अनेकांचे रोजगार जाऊन लोक लॉकडाऊनमुळे घरी बसले आहेत. रेड झोन मधून आलेल्या काही मोजक्या लोकांमुळे कोल्हापूर मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला ,तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची योग्य ती खबरदारी आरोग्य प्रशासनाने घेऊन योग्य औषधोपचाराने काही रुग्ण कोरोना मुक्त केले आहेत .

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना ग्रस्तांची संख्या पुणे व मुंबई या शहरात असल्याने, कोल्हापूरसारख्या सुरक्षित जिल्ह्यात टीव्ही निर्माते बाहेरून शेकडो जणांना चित्रीकरणासाठी आणतील, यामुळे कोरोनाचा फैलाव वाढल्यास याची प्रशासन जबाबदारी घेईल का? याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे देवस्थान समिती चे अध्यक्ष भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह वरून प्रशासनाला विचारणा केली होती.

याला तोडगा काढत सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटने चित्रीकरणासाठी मुंबई व पुणे येथून येणाऱ्या कलाकारांना बंदी घालून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कलाकारांना संधी दिल्यास चित्रीकरणाचे काम पूर्ण होऊन स्थानिक कलाकारांना रोजगार उपलब्ध होईल , असे निवेदन सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे अध्यक्ष गणेश विलासराव वाईकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *