विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : भरधाव मोटरसायकल चालवून पादचारी पती-पत्नीला मागून जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी असलेल्या आकुबाई चंद्रकांत पवार (वय ५३, रा. शांतीनगर, उचगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गडमुडशिंगी रस्त्यावर हॉटेल ७-१२ जवळ गुरुवारी झाला.
दुचाकीस्वार बाळू धुळाप्पा बनकर (रा. बिरोबा मंदिरजवळ गडमुडशिंगी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
बाळू बनकर यांने भरधाव मोटरसायकल (क्र. एम एच ०९ सी पी ७२६१) चालवून चंद्रकांत अण्णाप्पा पवार व आकुबाई चंद्रकांत पवार या पादचारी पती-पत्नीस जोरदार धडक दिली. त्यात अकुबाई पवार या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद आकुबाई यांचे पती चंद्रकांत अण्णाप्पा पवार यांनी मंगळवारी (दि. १२) रोजी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. बाळू बनकर यांने मोटरसायकलचा क्रमांकही बनावट वापरला होता. बनकर याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.
भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने उचगावची महिला ठार

Read Time:1 Minute, 42 Second