Share Now
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी साजणी ग्रामपंचायत व साजणी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केली.
संपूर्ण ग्रामीण रूग्णालयाची व परिसराची पाहणी करताना तेथील सोयी – सुविधांचा आढावा आमदार सुजीत मिणचेकर यांनी घेतला. रूग्णांसाठी किती खाटांची व्यवस्था आहे ?, रूग्णांची काळजी योग्य प्रकारे घेऊन त्यांना वेळेत औषधोपचार दिला जातो का? याची विचारणा मिणचेकरांनी केली.
रूग्णांची सेवा करताना स्वतःला जपत , योग्य ती खबरदारी घेऊन काम करण्याची सूचना मा. सुजित मिणचेकर यांनी ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दिल्या.
तसेच साजणी ग्रामपंचायतीला भेट देऊन त्याची पाहणी केली. व कोरोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा घेऊन तेथील मान्यवरांसोबत चर्चा केली.
Share Now