Share Now
Read Time:1 Minute, 3 Second
विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री धूळसिद्ध बिरदेव मंदिरात गर्दीला फाटा देत मोजक्या भाविकांनी श्री बिरदेव जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला.
सकाळी सात वाजता मोजक्या भाविकांनी मंदिरात येऊन बिरदेवाचा पाळणा व गाभारा फुलांनी सजवला.
यावर्षी प्रथमच कोरोना च्या पार्श्वभूमीवर जन्मोत्सवानिमित्त गर्दीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
श्री बिरदेवभक्त पांडुरंग साळोखे यांनी जन्मोत्सवानिमित्त फुलांची अत्यंत नयनमनोहर सजावट केली. दरम्यान वळीवडे येथेही बिरदेव मंदिरामध्ये हा जन्मोत्सव साध्यापणाने साजरा केला.
Share Now