Share Now
Read Time:1 Minute, 13 Second
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना महामारी च्या संकटामुळे बरेच उद्योगधंदे तसेच बांधकामे बंद असल्याने कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा अडचणीत असलेल्या कामगार व मजुरांना दिलासा मिळावा या हेतूने एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय सुंके यांनी जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.संजयजी बजाज, कमलाकर पाटील ,राहुल पवार ,आयुब बारगिर ,सुनील यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सचिन भोसले, यश सुंके, सचिन सगरे, जावेद मुल्ला मामा यादव व नागरिक उपस्थित होते.
Share Now