सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : आज १५ मे रोजी सांगली मिरज,कुपवाड़ महानगरपालिका आणि आय एम ए सांगली व मिरज यांचे संयुक्त-विद्यमाने कोव्हिड -१९ चे पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकमी सर्व शासकिय व खाजगी दवाखाने यांचेसाठी मार्गदर्शक सुचना असलेल्या पुस्तकाचे अनावरण मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले आहे .
सदरची कोव्हिड-१९ मार्गदर्शक पुस्तिका डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. प्रिया प्रभु असोसियट प्रोफेसर व जि एम सी मिरज यांनी तयार केलेली आहे.
ही कोव्हिड- १९ मार्गदर्शक पुस्तिका तयार करणेकामी स्मृती पाटील उपआयुक्त सा.मि. कु .मनपा यांचे विशेष प्रयत्नामुळे सर्व दवाखान्यासाठी याची मदत होणार आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त नितिन कापडणीस, स्मृती पाटील उपआयुक्त सा.मि.कु मनपा, डॉ. प्रिया प्रभु असोसियट प्रोफेसर शा. वै. महाविद्यालय व रुग्णालय मिरज तसेच अध्यक्ष आय एम ए सांगली व मिरज व डॉ. विनोद परमशेट्टी ,डॉ. प्रिया प्रभु असोसियट प्रोफेसर डॉ. शशिकांत दोरकर, डॉ. स्नेहल मालगावे, डॉ. श्रीनिकेटन काळे हे उपस्थित होते.
