भारत माता की जय ! “वंदे मातरम्” घोषणा देत ८२४ मजूर उत्तरप्रदेशकडे रवाना

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : ‘भारत माता की जय ! “वंदे मातरम्”  अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले उत्तरप्रदेशमधील ८२४ मजूर आज दुपारी १ वा. श्रमिक विशेष रेल्वेने उत्तरप्रदेशमधील बलियाकडे रवाना झाले.

इचलकरंजीमधील ६८०, गडहिंग्लजमधील १३१ आणि हातकणंगलेमधील १३ अशा ८२४ जणांचा यात समावेश आहे. या सर्वांना २ दिवसांच्या जेवणाची तसेच नाश्ता आणि पाणी याचे किट वाटप करण्यात आले.

Advertisements

यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, संजय पवार-वाईकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, प्राचार्य डॉ. महादेव नरके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *