कोल्हापूर प्रतिनिधी : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर ९० डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या ४ पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील महालक्ष्मी हॅाल मंगळवार पेठ, मनोरा हॅाटेल राजेंद्र नगर, सुखसागर हॅाटेल लक्ष्मीपुरी व जयंती पंपिंग स्टेशन (लॅाग पोकलेन) येथे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरू आहे.
महापालिकेच्यावतीने शहर मधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये ५० कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने ४७६ नाल्यापैकी २९२ लहान नाले व १०९ मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसले मळा, साळोखेमळा, समाज कल्याण ऑफिस अशा २९२ नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

