Share Now
सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यातील विनाशिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळावे,याकरीता मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शासन निर्णयाप्रमाणे राज्य योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना शासनाकडून मोफत तांदुळ देण्यात येत आहे, परंतु शिधापत्रिका नसणाऱ्या गरजू व गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. म्हणून शासन निर्णयाप्रमाणे योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांनाही मे व जून माहे २०२० या कालावधीत तांदूळ देण्यात यावे, यासंदर्भात मा. मदन भाऊ युवा मंच यांच्याकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आज मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन दिले.
याप्रसंगी मा. मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, नगरसेवक संतोष पाटील, मदिना इलाही बारूद वाले ,रोहिणी पाटील, मनगु आबा सरगर ,प्रकाश मुळके, आदी उपस्थित होते.
Share Now