गडमुडशिंगीच्या सरपंचपदी जितेंद्र यशवंत बिनविरोध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सत्तारूढ शिवाजीराव पाटील शेतकरी विकास आघाडीचे जितेंद्र तानाजी यशवंत यांचा एकमेव  अर्ज आल्याने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

  सत्तारूढ शिवाजीराव पाटील शेतकरी विकास आघाडीमध्ये रोटेशन पद्धतीने सरपंचपद देण्याचे ठरले होते. त्यानुसार मावळत्या सरपंच आक्काताई संजय सातपुते यांचा कार्यकाल संपताच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच हे पद रिक्त होते. या पदासाठी शुक्रवार दिनांक २२ रोजी निवड झाली. सत्तारूढ आघाडीचे प्रमुख तानाजी पाटील यांनी जितेंद्र यशवंत यांचे नाव सुचविले. या निवडीसाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना गुळवणी यांनी जाहीर केले.
विरोधी पॅनेलचे राजर्षी शाहू आघाडीचे सदस्य निवड बैठकीस अनुपस्थित राहिल्याने ही निवड बिनविरोध झाली.
यावेळी निवड बैठकीस उपसरपंच तानाजी पाटील , ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कांबळे, आक्काताई सातपुते, सुरेखा गवळी, अशोक दांगट, जयश्री रेवडे, रोहिणी कामिरे, ताराबाई गोसावी, गोदाबाई माळी व सहाय्यक निवडणूक अधिकारी भिउंगडे हे मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *