मर्यादित स्वरूपात कोल्हापूर विमान सेवा सुरू
प्रवाशांना क्वारंटाईन करणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : ६१ दिवसापासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून मर्यादित स्वरूपात सुरू झाली.

नियोजित इंडिगो व अलाइंस एअर या दोन कंपन्यांपैकी फक्त अलाइंस चे विमान आज कोल्हापूर विमानतळावर ठीक दोन वाजून ४५ मिनिटांनी लँडिंग झाले, यावेळी हैदराबाद वरून आलेल्या या विमानातून १४ प्रवासी आले होते त्यापैकी तीन प्रवासी रत्नागिरी येथील असल्यामुळे त्यांना प्रशासनाच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर कोल्हापूरहून हैदराबादला १८ प्रवासी घेऊन विमानाने टेक ऑफ केले. दरम्यान एका प्रवाशाचा ताप जास्त असल्याने त्यांना प्रवाशास परवानगी देण्यात आली नाही.
विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांना डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये स्क्रीनिंग करण्यासाठी के.एम.टी ने पाठवण्यात आले. हॉस्पिटल व प्रशासनाच्या वतीने सर्व प्रवाशांना १४ दिवस क्वारंन्टाईन करण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार खाजगी अथवा शासकीय विलगीकरण कक्षात राहता येईल.

Advertisements

दरम्यान उद्या अलाइंस एअर कंपनीचे विमान ठीक अडीच ते तीन च्या दरम्यान येणार असून, इंडिगो एअरलाइन्सची विमान सेवा सुरळीतपणे सुरू होण्यास दोन-तीन दिवसांचा अवधी असल्याचे सांगण्यात येते. यावेळी कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून विशेष खबरदारी घेण्यात येत होती.यामध्ये विमान प्रवास करण्यासाठी आलेल्या सर्व प्रवाशांना कोरोना संरक्षण किट देण्यात येत होते त्याचबरोबर विमान प्रवाशांच्या सर्वसामान्यांचे निर्जंतुकीकरण सोशल डिस्टन्सिंगसाठी आसन व्यवस्था व जमिनीवरती विशिष्ट चिन्हाने चिन्हांकन करण्यात आले होते. प्रवाशांच्या सामानाची विमानतळ कर्मचाऱ्यांकडून कॉन्टॅक्टलेस व तपासणी करण्यात येत होती. तसेच तिकीट तपासणी व बोर्डिंग पास सुद्धा काँटॅक्टलेस प्रक्रियेद्वारे देण्यात येत होता. यावेळी एअर होस्टेस यांनी पी पी किट घालून आपली सेवा बजावत होत्या. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करवीरच्या तहसीलदार शितल मुळे- भांबरे , गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया व विमानतळ सुरक्षा विभाग प्रमुख अशोक इंदुलकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर कालपासून कोल्हापूरहून हैदराबाद साठी विमानाने टेक ऑफ केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *