मुंबईतून आलेल्या मिरज दत्त कॉलनी येथील वृद्धाला करोनाची लागण

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 33 Second

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील दत्त कॉलनी क्रमांक पाच येथे एका वृद्धाला करुणा ची लागण झाली असून , ही कोरोनाग्रस्त व्यक्ती मुबंईतून   आलेली आहे.

आज ही व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे असं समजताच त्यांच्या संपर्कातील १४ जणांना इन्स्टिट्यूट मध्ये कॉरंटाईन करण्यात आले व तिघांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले .
प्रशासनाच्या वतीने दत्त कॉलनी रस्ता क्रमांक पाच मधील भाग तातडीने सील करण्यात आला.
यावेळी आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी , डी वाय एस पी संदीप सिंग गिल , महापालिका आयुक्त कापडणीस , उपायुक्त स्मृति पाटील , नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन आवटी , पोलीस प्रशासन हे सर्व मान्यवर घटनास्थळी एकत्रित आले. व  या मान्यवरांनी   त्या ठिकाणाची पाहणी करून  योग्य  उपाययोजना  केल्या.

तसेच दत्त कॉलनी रस्ता क्र. पाच मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून प्रशासनामार्फत तातडीने औषध फवारणीही करण्यात आली आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *