मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना पार्श्वभूमीवर ट्रक चालक व हमालांची तीव्र टंचाई जाणवत आहे. २०० हमाला ऐवजी ९० हमालच कामावर येत असल्याने कोल्हापूरच्या गुड्स मार्केट यार्ड रेल्वे बग्गीतून खते व रेशनधान्य वेळेत उतरून घेण्यास अडचणी येत आहेत तसेच हमाल , ड्रायव्हर व ऑफिस स्टाफ यांना संचारबंदी मुळे ये – जा करणे अशक्य झाले आहे.
सध्या ३०% हमाल असल्याने २४ तास तेच हमाल जीवावर उदार होऊन काम करत असतात. दोन मालगाड्या लावल्यानंतर ९० लोकांत काम होऊ शकत नाही. मालगाडी वेळेत खाली न केल्याने रेल्वे प्रशासनाला दंड भरावा लागतो त्याचप्रमाणे रेल्वे मधून येणारा माल ठेवण्यासाठी जागाच नसल्याने , लागोलाग रेल्वेमधून ट्रक मध्ये भरावे लागत आहे.
कोल्हापूर हे अतिपर्जन्य कोकणपट्टीत असल्याने पावसाळ्यात मालाची हानी होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून रेल्वे प्रशासनाने एक कव्हर शेडची सोय करून द्यावी जेणेकरून पावसाळ्यात माल ठेवता येईल . ह्या सर्व मागण्या व तुर्टीची पूर्तता व्हावी अशी कॉन्टॅक्टर असोसिएशन तर्फे मागणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे रेल्वे सर्व अडचणींचा विचार करून हाप रेकला मंजुरी द्यावी दिल्यास काम सुलभ होईल अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कॉन्टॅक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.