Share Now
Read Time:52 Second
जिल्हा माहिती कार्यालयाकडून : राधानगरी धरणामधून होणारा ८०० क्युसेकचा विसर्ग आज सकाळी ८ वाजता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी झाली असून, तांत्रिकदृष्ट्या ती मजबूत आहेत. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. प्रशासन पूर्ण क्षमतेने दक्ष असल्याचेही श्री. बांदिवडेकर म्हणाले.
Share Now