मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून ) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६० दलघमी पाणीसाठा आहे.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४४ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.७८ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी ३०.३५ दलघमी, कुंभी २७.३० दलघमी, पाटगाव २४.२७ दलघमी, चिकोत्रा १३.९३ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ७.४३ दलघमी, घटप्रभा १२.७० दलघमी, जांबरे ५.७९ दलघमी, कोदे (ल पा) ०.९९ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ११.२ फूट, सुर्वे ११.६ फूट, रुई ३९ फूट, तेरवाड ३४ फूट, शिरोळ २७.६ फूट, नृसिंहवाडी २३ फूट, राजापूर १२ फूट तर नजीकच्या सांगली ५.६ फूट व अंकली ८.६ फूट अशी आहे.
तर जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात २.८३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात शाहुवाडी तालुक्यात २.५० मिमी पावसाची नोंद झाली असून इतर सर्व ठिकाणी पाऊस निरंक आहे.