अनिल उर्फ आप्पा या मोका मधील दोन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अटक

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मोका अंतर्गत दाखल गुन्हयात तसेच इतर गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले , फरारी असलेले आरोपी शोध मोहिम राबविणे बाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रमुख यांना आदेशीत केले आहे.

तसेच सध्या कोरोना साथीच्या आजाराच्या अनुषंगाने पुकारणेत आलेल्या देशभरातील लॉकडाऊन संदर्भात सक्त नाकाबंदी पैट्रोलींग करण्याचे  आदेश दिले आहेत .

Advertisements

शहापूर पोलीस ठाणे गुन्हा र.नं.१७८/२०१८ भा.द.वि.स.क.३९५,३२३,४५२, ४५४ , ५०४,५०६ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (दोन) ,( २),(४), (५) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी सौ.मंगल शिवानंद हाजिंगे रा.जे.के.नगर तुळजाभवानी अर्पाटमेंट बी / १ शहापूर ता.हातकणंगले या १८ नोव्हेंबर २०१८ रोजी घरी असतांना आरोपी पिंटू उपेंद्र रॉय व त्याचे सहकारी यांनी फिर्यादीचं नातवंडं दंगा करतात व भांडण तंटा करतात, म्हणून चिडून जावून जबरदस्तीने घरात घुसून मारहाण करून सोन्याचे दागिने काढून घेतले होते, तसेच त्या सर्वांना अमोल माळी गँगची आम्ही माणसे आहोत आमचेकडे बंदुक आहे, असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात मा.विशेष महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत  मंजूरी  दिली आहे . तेव्हा पासून १) अजित अशोक माळी व २) मिटू उपेंद्र रॉय हे आरोपी फरार झाले आहेत .

आरोपी मिंटू उपेंद्र रॉय वय ३२ रा . तुळजाभवानी अर्पाटमेंट बिल्डींग नं ०२ , प्लॅट नं .३ , शहापूर ता . हातकणंगले, मुळ गांव जहाँगीरपूर शाम ता . देसीरी जि.वैसाली राज्य बिहार हा निगडी पोलीस ठाणे जिल्हा पुणे चे कार्यक्षेत्रात गरवारे टेक्नीकल फॅब्रिक्स , आकुर्डी – चिखली रोड , चिंचवाड पुणे या कारखान्यात काम करत असल्याची माहिती तानाजी सावंत , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , कोल्हापूर यांना गोपीनीय बातमीदार यांचे मार्फत मिळाले बातमीचे अनुषंगाने त्यानी आरोपीस अटक करणेकामी शाखेकडील पोहेकॉ इकबाल महात , असीफ कलायगार , सचिन देसाई व प्रदिप नाकिल यांचे पथक नियुक्त केले . त्या अनुषंगाने सदर पथकाने आरोपी मिंटू उपेंद्र रॉय वय ३४ रा . तुळजाभवानी अर्पाटमेंट बिल्डींग नं ०२ , प्लॅट नं .३ , शहापूर ता . हातकणंगले मुळ गांव जहाँगीरपूर शाम ता . देसीरी जि.वैमाली राज्य  बिहार यास वर नमुद कारखान्याच्या  समोरुन दिनांक ६ जून २०२०  रोजी दुपारी १  वाजता  ताब्यात घेतले आहे .

त्याच्या  विरुद्ध शहापूर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास उप- विभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग श्री .गणेश बिरादार हे करीत आहेत .

या  कारवाईत  पोलीस अधीक्षक श्री .डॉ.अभिनव देशमुख , श्री .अपर पोलीस अधीक्षक श्री . तिरुपती काकडे , पोलीस उप अधीक्षक श्री .गणेश बिरादार , पोलीस निरीक्षक  श्री .तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ इकबाल महात , सचिन देसाई , असीफ कलायगर व प्रदिप नाकिल यांनी सहभाग घेतला होता.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *