Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठीच व्हावा, असा हेतू ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस यंदाच्या वर्षी आरोग्यम म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील कोणाला प्रत्यक्ष भेटणार नाहीत, परंतू आरोग्यम उपक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा स्विकारणार आहेत.
आरोग्यम उपक्रम म्हणजे ताप मोजण्यासाठी लागणारे १२० रुपयांचे थर्मामीटर आपण गरजू, दु्र्लक्षित घटकांना देण्यात येणार आहे. तसेच अनेकांना थर्मल मशीन, मोठया सोसायटी व अपार्टमेंट ठिकाणी सॅनिटायझर स्टँड ही देण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील सर्व ८१ प्रभागात त्या दिवशी विविध सामाजिक उपक्रम जसे वृक्ष लागवड, लोकांना आर्सेनिक अल्बम ३० च्या होमिओपॅथी औषध वाटप, रक्तदान शिबीर, आयुष्यमान योजना कार्ड वितरण, गरजू मुला-मुलींना वह्या वाटप, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अशा विविध उपक्रमांनी करण्यात येणार आहे.
नेहमीच श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होतो. त्यामध्ये लोक सहभाग महत्वाचा असतो, यावर्षीही ज्या लोकांना थर्मामीटर, थर्मल मशीन, सोसायटी व अपार्टमेंट ठिकाणी सॅनिटायझर स्टँड अशा गोष्टी पुरवायच्या आहेत. त्यासाठी ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी संवेदना सोशल फौंडेशन या नावाने चेक संवेदना सोशल फौंडेशनकडे जमा करावेत, असे आवाहन संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. राहूल चिकोडे यांनी केले आहे.
आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारा आणि समाजाला काहीतरी देणारा अशा स्वरूपाचा असतो.
यापूर्वी केलेल्या वाढदिवसामध्ये रद्दीच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारून ती रद्दी व आपल्याकडील काही मदत देवून स्वयंसिद्धा संस्थेस प्रोजेक्ट प्रदान करण्यात आला. जीवनरक्षक दिनकर कांबळे यांचा विमा उतरवण्यात आला. रोपांच्या माध्यातून शुभेच्छा स्वीकारून, शहरातील वाढते प्रदूषण आणि तापमान वाढ रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज ओळखून जवळपास ३५ हजार रोपे केएसबीसीच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लावून शहराचे सौदर्य खुलवून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही दिला.
शेतकऱ्यांना खते मिळाली तर त्याला थोडासा हातभार लावता येईल, या उद्देशाने खतांच्या स्वरूपात शुभेच्छा स्विकारून जिल्ह्यातील ५० हजार शेतक-यांना युरीया या दाणेदार खताचे नियोजनपूर्ण वितरण करण्यात आले. वयोवृद्ध लोकांची सेवा करणारे सावली केअर सेंटर उभारणीसाठी मदत अशा नाविन्यपूर्ण कामातून संकल्प बांधून वाढदिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील शुभेच्छा या कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्यमय स्वरूपात वाढदिवस साजरा करून सामाजिक काम करून या.
तरी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी SANVEDANA SOCIAL FOUNDATION, AC.Number – 60300949891
IFS Code:- MAHB0001130 Salokhenagar,Branch, kolhapur 416007
यावर आपण मदत नोंदवावी, असे आवाहन अध्यक्ष श्री. राहूल चिकोडे यांनी केले आहे.