सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात १८०० मिलीमीटर पाऊस झाला तर अन्यस्त्र ३२१ मिलीमीटर पाऊस झाला होता यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली होती.
यावर्षी मान्सून काळात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सक्षमतेने हाताळण्यास प्रशासनाची जय्यत तयारी सज्ज असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारी आढावा व कोरोना आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली .
यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सांगली,मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस ,अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी जिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.गुणाले, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर ननंदकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.