Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६२ दलघमी पाणीसाठा आहे.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४८ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.१२ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी ३०.२० दलघमी, कुंभी २७.३० दलघमी, पाटगाव २४.४० दलघमी, चिकोत्रा १३.९३ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ७.२७ दलघमी, घटप्रभा १२.३९ दलघमी, जांबरे ५.६४ दलघमी, कोदे (ल पा) १.०१ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ११ फूट, सुर्वे ११ फूट, रुई ३८.६ फूट, तेरवाड ३३.६ फूट, शिरोळ २७ फूट, नृसिंहवाडी २२.३ फूट, राजापूर १२ फूट तर नजीकच्या सांगली ५ फूट व अंकली ६.७ फूट अशी आहे.
पाऊस / तालुकानिहाय
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावड्यात तालुक्यात ३१.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तसेच जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पन्हाळा तालुक्यात १.५७ मिमी, शाहुवाडी तालुक्यात ३ मिमी, राधानगरी तालुक्यात २.१७ मिमी, गगनबावडा तालुक्यात ३१.५० मिमी, गडहिंग्लज तालुक्यात ०.५७ मिमी व चंदगड तालुक्यात ४.१७ मिमी पावसाची नोंद झाली असून इतर सर्व ठिकाणी पाऊस निरंक आहे.