शिवसेना आणि व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी  : कोरोना व्हायरसमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे.देश संकटात असताना सरकारच्या मदतीला देशातील उद्योजक धावून आले आहेत. त्यातच चीन सीमेवर भारतावर कुरघोडी करू पहातय, त्यामुळे चीनची मस्ती जिरवण्यासाठी प्रत्येक भारत देशवासीयांनी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकून, स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले.

जगाला कोरोना व्हायरसमुळे त्रस्त करणाऱ्या आणि जगात चीनी हुकुमशाही गाजवू पाहणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था दुबळी करण्याची ताकद भारतीयांच्यात आहे. चीन जाणूनबुजून खुरापती करत असून, त्याला भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे देशवासियांच्यात चीन विरोधात खदखद निर्माण झाली आहे. ही खदखद सर्वसामान्यांनी दाखवून चीनी मालावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना आणि कोल्हापूर जिल्हा व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी करण्यात आली.

Advertisements

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी चीनच्या अरेरावीचा मुकाबला करण्यासाठी चीनी वस्तूवर बंदी घालण्याची गरज आहे. चीनमधून येणाऱ्या ३००० वस्तू भारतात तयार होऊ शकतात. चीन मधील वस्तूपेक्षा भारतीय वस्तूंचा दर्जा कितीतरी पटीने चांगला आहे. त्यामुळे आपण इथून पुढे आत्मनिर्भर होणे हेच चीनी खुरापती वर उत्तर आहे. मात्र केवळ बहिष्कार टाकून उपयोग होणार नाही तर तो निर्णय अंमलात आणणे गरजेचे आहे. चीनी वस्तूला पर्यायी वस्तू भारतीय बाजारपेठेत तयार करण्याकरिता भारतीय उद्योजकांना पुढे येणे गरजेचे आहे. शासनाने त्यांना मदत देवू केली आहे. याचा वापर करून भारत देश आपल्या गरजासाठी वस्तू तयार करू शकतो, हे दाखवून देण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांनी चीनी बनावटीची वस्तू आयात करू नये, नागरिकांनी चीनी बनावटीची वस्तू खरेदी करू नये, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर, संजय गांधी निराधार योजनेचे किशोर घाटगे यांनी मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, व्यापारी महासंघाचे संजय चंदवाणी, अमर क्षीरसागर, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू हुंबे,  दीपक गौड,  रवीभाऊ चौगुले, अरुण सावंत, जयवंत हारुगले, सुनील जाधव, यांच्यासह शिवसेना, युवासेना व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *