पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शिवसैनिकाने वृक्षारोपण करावे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे.

या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण मंत्री नामदार श्री.आदित्य ठाकरे यांना पर्यावरण पूरक शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूर शहर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने “जन्मदिनी वृक्ष लावू प्रत्त्येकानी” अशा वृक्षारोपणाच्या संकल्पाचे आयोजन करण्यात आले असून, आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक आणि युवासैनिकांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Advertisements

पर्यावरण मंत्री नामदार श्री.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दि.१३ जून रोजी सकाळी १०.०० वाजता प्रस्तावित असलेले “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, राजहंस प्रिंटींग प्रेस मागे, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेना आणि युवासेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

 

 

ठाकरे कुटुंबियांचे कोल्हापूर आणि कोल्हापूरवासियांवर अत्यंत जिव्हाळ्याचे नात असून, पर्यावरण मंत्री नामदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिनी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम पार पडतात. दरवर्षी पेक्षा अनोखा उपक्रम आणि संकल्पना राबविण्याची आणि पूर्णत्वास नेवून त्यांना शुभेच्छा देण्याची सुरवात आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून करत आहोत.

निसर्गातील हिरवाई टिकवण्यासाठी, प्रदुषणाचा भार कमी करण्यासाठी आणि पर्यावरण मंत्री नामदार श्री.आदित्य ठाकरे यांच्या कार्यास बळकटी देण्यासाठी ही वृक्षारोपणाची आणि वृक्ष संगोपनाची चळवळ आपण हाती घेत असून, जिल्हा व शहरातील तमाम शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक या चळवळी मध्ये सहभागी होवून ही संकल्पना पूर्णत्वास नेवूया.

याकरिता तमाम शिवसैनिक आणि युवासैनिकांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *