नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया च्या कोल्हापूर विभागाच्या सचिव नेहा देसाई यांचा एक हात मदतीचा उपक्रम
बळीराजासाठी जीवनदान

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  सध्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सगळेच हलाखीच्या परिस्थितीतून जात आहेत. कोरोना सारख्या साथीच्या रोगातून लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत सर्वात जास्त अडचणीत आहे तो म्हणजे आपला “अन्नदाता शेतकरी”.

नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने झाडे लावून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सर्व समाजाने एक कृतज्ञता म्हणून आपल्याला जगवणाऱ्या अन्नदात्याला ही व्यक्त करूया या कृतज्ञनेतून ह्या उपक्रमाची सुरुवात झाली.

Advertisements

 या संकट काळात आपला “एक मदतीचा हात आपल्या बळीराजाला देऊया या सगळे मिळून पेरणीसाठी मूठभर धान्य देऊया””असा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे.

मूठभर धान्य देऊन शेतकऱ्याला पेरणीसाठी मदत करणाऱ्या ह्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या परीने धान्य किंवा बियाणे देण्यासाठी ह्या उपक्रमाचे आयोजन टीम स्कायव्हिजनचे प्रवीण माने, नितिन माने, नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया च्या कोल्हापूर विभागाच्या सचिव नेहा देसाई,स्नेहल पाटील, आणि संग्राम पाटील यांनी केले.

मदतीसाठी प्रवीण माने यांना ८४१२८३८५०३ या क्रमांकावर संपर्क करू शकता. असे आवाहन ही नेहा देसाई यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *