आरोग्य विभागाच्यावतीने चौथ्या टप्यात ६४५८ घरांचे व २४९५६ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.

  पहिल्या टप्यामध्ये दि.१८ मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून, यामध्ये  १४४३१९  घरांचे सर्व्हेक्षण केले असून, यामध्ये ६२८५३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

Advertisements

तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.२१ एप्रिल पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून, यामध्ये १४५१०२ घरांचे सर्व्हेक्षण केले असून, यामध्ये  ६४३९६१ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. तर तिसऱ्या टप्यामध्ये दि.१५  मे पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून, यामध्ये  १५४८९५ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ६६९९०७ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे चौथ्या टप्यात दि.१० जून २०२० रोजी ६४५८ घरांचे सर्व्हेक्षण केले असून, यामध्ये २४९५६ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

सदरचे सर्व्हेक्षण शिवाजी पार्क, रामानंदनगर, जरगनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, बालाजी पार्क, म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी, जीवबा नाना पार्क, मोती नगर, एस एस सी बोर्ड, मोरे माने नगर, निसर्ग पार्क, देवकर पानंद, साळोखे नगर, टाकाळा, विक्रमनगर, रुईकर कॉलनी, सिध्दार्थ नगर, जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, विचारे माळ, सदर बझार या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. या टप्यामध्ये आज अखेर ३४१३२ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये १५०५८३ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

सदरचा सर्व्हे हा ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या मार्फत देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *