कोल्हापूर जिल्ह्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांना “आंतरिक सुरक्षा सेवा पदक” जाहीर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : पोलिस सेवेत केलेल्या सर्वोत्तम कार्याचा गौरव व्हावा व अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी. याकरता पोलीस सेवेत चांगले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भंडारा,गडचिरोली ,चंद्रपूर, गोदिया, या नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयामार्फत आंतरिक सुरक्षा पदक देण्यात येते.

Advertisements

नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखून केलेल्या सेवेबद्दल जिल्ह्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांची आंतरिक सुरक्षा सेवा पदकासाठी निवड झाली आहे. 

जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी २०१६ ते २०१८ या कालावधीत पोलीस अधीक्षक म्हणून नक्षलग्रस्त भागातील गडचिरोलीत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे इचलकरंजी  पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार व कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनीही नक्षलग्रस्त भागातील पदभार सांभाळला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत यांच्यासह जिल्हातील २१ अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयामार्फत हे पदक बुधवारी जाहीर झाले.

 

 

आंतरिक सुरक्षा सेवा पदकाचे जिल्ह्यातील मानकरी

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे , गांधीनगर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, जयसिंगपूर पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,  शाहूपुरी पोलीस ठाणे राहुल वाघमारे,  गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे रविकांत गच्चे,  गांधीनगर पोलीस ठाणे अतुल कदम,  कागल पोलीस ठाणे प्रीतम पुजारी,  कागल पोलिस ठाणे निखिल खर्चे , करवीर पोलीस ठाणे विवेक राळेभात,  करवीर पोलीस ठाणे विक्रांत चव्हाण, करवीर पोलीस ठाणे अभिजीत भोसले,  जुना राजवाडा पोलिस ठाणे योगेश पाटील, शाहूपुरी पोलीस ठाणे सचिन पांढरे , गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी सोमनाथ कुडवे,  शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमोद मगर,  शिवाजीनगर पोलीस ठाणे भागवत मुळीक,  शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी राजेंद्र यादव,  शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी गणेश खराडे या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना स्वर्वोत्तम कामगिरीबद्दल “आंतरिक सुरक्षा पदक” जाहीर झाले आहे.

                                           

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *