कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस कोल्हापूर भाजपा महानगरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यावर्षी “आरोग्यम” ही संकल्पना अधोरेखीत करून संपूर्ण शहरात आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथीक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, मास्क वाटप, सॅनिटायजर वाटप ई. उपक्रम राबवण्यात आले त्याच प्रमाणे कोल्हापूर शहरातील प्रत्येक अपार्टमेंटला सॅनिटायजर डेस्क, थर्मलगन, थर्मामीटर ई. आरोग्यासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आम.चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मूनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे तसेच महाराष्ट्रातील असंख्य आमदारांनी, खासदारांनी मा. दादांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, समरजित घाटगे, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प.म.दे.अध्यक्ष महेश जाधव, माजी आम. सुरेश हाळवणकर, महादेवराव महाडिक, अमल महाडिक, हिंदुराव शेळके, अरुण इंगवले, आम.सुरेश खाडे, आम.सुधीर गाडगीळ, सांगली भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, सत्यजित देशमुख, सांगलीच्या महापौर सौ. गीता सुतार यांनी प्रत्येक्ष भेटून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.