कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील विराज विलास जगताप या २० वर्षीय मुलाचे सवर्ण मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबियातील आरोपी हेमंत काटे,सागर काटे,रोहित काटे,कैलास काटे,जगदीश काटे, हे सर्व राहणार पिंपळे सौदागर येथील असून यांनी विराज जगतापची हत्या केली.
पिंपळे सौदागार भागात रविवार ७ जून रोजी ही घटना घडली असून, या पाच आरोपींनी पिंपळे सौदागर भागातील पुलाजवळ विराजला गाठले व त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती.
या घटनेचा एम.आय.एम, डी.पी.आय व पुरेगामी दलित महासंघाकडून निषेध करण्यात आला व जिल्हाअधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच खालील मागण्या करण्यात आल्या.
त्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
१) ही केस तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चालवून जगताप कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.
२) जगताप कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.
३) जगताप कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी.
दरम्यान यावेळी एम.आय.एम पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख, एम.आय.एम शहर युवा अध्यक्ष सुहेल शेख, डी.पी.आय शहर अध्यक्ष प्रविण वाघमारे, पुरोगामी दलित महासंघ जिल्हाअध्यक्ष सतीश कांबळे, एम.आय.एम शहर उपाध्यक्ष तौसीफ मौमीन, जावेद शेख, इम्रान शेख, इस्तियाक नदाफ, फहीम वस्ता, हाफीज तुफेल शेख, इजाज बागवान, विशाल कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.