सीपीआरची कोरोनाशी समर्थ झुंज

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 2 Second

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : सी.पी.आर. रुग्णालय कोल्हापूर येथील कोरोना कक्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात आज अखेर तपासलेले एकुण रुग्ण संख्या – २६८१६ ( आंतरराष्ट्रीय ४७५ व  डोमेस्टिक २६३४१ ) रुग्णालयात भरती करण्यात आलेले एकुण रुग्ण – ३१३ रुग्णालयातून डिस्चार्ज झालेले एकुण रुग्ण – २५१  सद्यस्थितीत रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये दाखल असलेले रुग्ण – ५८ ( ५० स्थिर ०८ गभीर ) बाह्यरुग्ण विभागात तपासणी नंतर कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या स्वबची संख्या – १९५६३ चाचणी अहवाल प्राप्त एकुण संख्या – १९४६१ चाचणी अहवाल अद्याप अप्राप्त- १०२ चाचणी अहवाल निगेटीव्ह एकुण संख्या – १८७५६ चाचणी अहवाल पॉझिटीव्ह एकुण संख्या -६३९ दि .२५ / ०५ / २०२० पासून कोविड -१९ बाधित रुग्णाचे कोरोना मुक्तीचे प्रमाण वाढले असून, सध्यस्थितीत या रुग्णालयातील कोरोना कक्षात फक्त ५८ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

 त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारास चांगला प्रतिसाद देत आहेत. रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे.

सध्यस्थितीत या आजारावर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नसल्याने अत्यावस्थ रुग्णांना कोरोना मुक्त करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झालेला आहे . तसेच रुग्णांना डायबिटीस, हृदयरोग, उच्च रक्तदाब इत्यादी रोग नियंत्रणात ठेवण्याकडे कल राहिलेला आहे.

ज्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. औषधवैद्यकशास्त्र विभाग , बधिरीकरणशास्त्र विभाग , छाती व उररोगशास्त्र विभाग व .हृदयरोगचिकित्सा विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .या विभागाव्यतिरिक्त संस्थेतील इतर विभागातील सर्व डॉक्टर्स हे फल्यू ओपीडी , कोरोना स्किनिंग ओपीडी २४ तास कार्यरत आहेत.

तसेच या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा सुरळीत ठेवणेकरीता संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे समन्वयाने कामकाज करीत आहेत . जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

ज्येष्ठ नागरिक व इतर व्याधिग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कोरोना मुक्त होणा-या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, लवकरच कोल्हापूर जिल्हा कोरोना मुक्त होईल, यात शंका नाही . या उपक्रमामध्ये जिल्ह्याचे तीनही मंत्री महोदय , जिल्हाधिकारी, आयुक्त, सी ई ओ, पोलीस अधीक्षक या सर्वांचा सक्रिय सहभाग व मदत आहे, असे अधिष्ठता डॉ. आरती घोरपडे यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *