कोरोना हटाव देश बचाव व चिनी वस्तू वरती बहिष्कार निषेधार्थ कॅन्डल मार्च

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर येथे बहुजन पार्टी महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती यांच्यावतीने कोरोना हटाव देश बचाव, हा नारा देत छत्रपती राजाराम महाराज पुतळ्यासमोर व्हीनस कॉर्नर येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरलेल्या (वुहान) चीन देशातून आलेल्या कोरोना विषाणूचा तीव्र विरोध करीत चायना व चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकावा, यासाठी निषेध करण्यात आला. तसेच कोरोना हटाव देश बचाओ हा एक सामाजिक उपक्रम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर राबवत आहोत.

 

 

मानव सेवा हीच खरी समाज सेवा आहे. कॅन्डल मार्च कार्यक्रमात बहुजन परिवर्तन पार्टी कॅन्डल मार्च चे प्रणेते पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष भारत मोरे पाटील,  महाराष्ट्र महिला बचाव समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हाशिम नूरानी भाभी, उपाध्यक्ष शीला दीपक, अनिता कांबळे, संजय मागाडे शिराज भाई नुरानी दीपक भोसले ,शिवाजी पोवार ,दगडू कांबळे ,विनायक पोळ, संजय मिठारी, दत्ता दिवटे, राजन पिडाळकर व सर्वपक्षीय कृती समितीचे महेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Advertisements

   चीनमुळे कोरोना हा विषाणू जगात व भारतात पसरला, असल्यामुळे  चीन या देशाचा निषेध व्यक्त करत कोरोना बाय-बाय, चीन हाय हाय, अशा घोषणा देत चीनचा जाहीर निषेध करण्यात आला.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *