Share Now
Read Time:1 Minute, 9 Second
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोल्हापूर शहरातील काही नागरीक हे जनावरे पाळण्याचा व्यवसाय करतात. ही जनावरे उघडयावर सोडली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच नागरिकांना जनावरांकडून मारहाणीचे प्रकार घडत असल्यामुळे, नागरिकांना रस्त्यावरुन फिरणे अडचणीचे झाले आहे.
या बाबतीत उपाय- योजना करणे कामी महानगरपालिका आरोग्य विभागांअतर्गत उनाड व भटकी जनावरे पकडण्याची मोहिम सुरु असुन, सर्व शहरवासियांनी आपली स्वमालकीची जनावरे रस्त्यावर सोडू नयेत. अन्यथा जनावरे सोडल्यास, जनावरे पकडून मालकांवर रितसर कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
Share Now